'आदित्य ठाकरे कोण ?, मी ओळखत नाही'


एएमसी मिरर : वेब न्यूज
आदित्य ठाकरे कोण आहे? मी त्याला ओळखत नाही, अशा शब्दात वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून बिचुकले आणि ठाकरे असा सामना होणार आहे. त्याला आता कुणी रोखू शकत नाही. वरळीत भगवं वादळ दिसतंय यावर बोलताना, असली वादळं अभिजीत बिचुकलेसमोर शून्य आहेत, अशी टीका बिचुकलेंनी शिवसेनेवर टीका केली.
साताऱ्यात 20 वर्ष मी छत्रपतींना मान दिला नाही, तर ठाकरे कोण आहेत. साताऱ्यात माझी गादी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वैचारिक वारसा जपतो. शरीराने जन्म दिला म्हणून वारस होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू-फुलेंचा वारसा मी पुढे नेतोय, असेही बिचुकलेंनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे कोण आहेत? ठाकरे कुणामुळे आहेत? जनतेशिवाय ठाकरे शून्य आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघाला ग्लॅमरस रुप माझ्यामुळे आलं, असा दावाही अभिजीत बिचुकले यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post