नगर जिल्ह्यात 1 वाजपर्यंत 33.73 टक्के मतदान


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.73 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण 34 लाख 73 हजार 743 मतदार असून, त्यापैकी 11 लाख 71 हजार 863 मतदारांनी 1 वाजपर्यंत मतदान केले आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत अकोले मतदारसंघात 37.14 टक्के, संगमनेर मतदारसंघात 36.09 टक्के, शिर्डीत 31.94 टक्के, कोपरगावमध्ये 32.35 टक्के, श्रीरामपूरमध्ये 25.29 टक्के, नेवासा 39.24 टक्के, शेवगावमध्ये 35.35 टक्के, राहुरीमध्ये 30.15 टक्के, पारनेरमध्ये 38.11 टक्के, नगर शहरात 27.49 टक्के, श्रीगोंदा 32.81 टक्के तर कर्जत-जामखेडमध्ये 38.45 टक्के मतदानाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून अधिकृपणे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post