नगर : महापौर वाकळेंनी नेला उमेदवारी अर्ज; चर्चेला उधाण


एएमसी मिरर : वेब न्यूज
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून माजीमंत्री अनिल राठोड यांना जाहीर झालेली असतांना व त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलेला असतांना भाजप नेते व शहराचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने खळबळ उडाली आहे.
पुष्कर कुलकर्णी यांच्याहस्ते बाबासाहेब वाकळे यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात वाकळे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आदेशाविरोधात भूमिका घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post