मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून सुदेशकुमार मोख्ता यांची नियुक्ती


एएमसी मिरर : नगर 
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर शहर विधानसभा मतदार संघ व पारनेर विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून सुदेशकुमार मोख्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदार संघातील सर्व निवडणूक प्रक्रियेचे ते निरीक्षण करणार आहेत.
मतदारांना निवडणूक विषयक  काही  तक्रारी,आक्षेप असल्यास त्यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांची शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9418812787 वर सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यत  संपर्क साधावा, असे आवाहन सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post