‘ख्रिस्ती समाज आमदार जगतापांच्या प्रचारात सक्रीय होणार’


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातमपुरा येथे अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्ह अ‍ॅण्ड पास्टर्स असोसिएशन व अहमदनगर काँग्रीगेशनल पहिली मंडळी यांच्यावतीने आ.संग्राम जगताप यांच्यासाठी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जगताप यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्यासाठी त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
शहरातील बिशप, रेव्हरंड, पास्टर्स सर्व मिळून 150 ते 200 सेवक यावेळी उपस्थित होते. सर्वांनी आ.जगताप यांच्यासाठी प्रार्थना करुन विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्यासाठी आशीर्वाद दिला.
यावेळी शामवेल भिंगारदिवे, दिपक पाडळे, सुधाकर साळवे, एम.एस.सावंत, जॉन्सन सेक्सपियर, तानाजी पाडळे, तेजपाल उजगरे, प्रकाश बल्लाळ, पी.जी.मकासरे, एस.डी.नाईक, योहान ओहोळ, अशोक मकासरे, डी.डी.सोनवणे, संजय पगारे, संजय घाटविसावे, मोजेस नेटके, राजू शिंदे, शमुवेल मगर, आशिष सावंत, सॅम नाईक, सत्यदास काकडे, दाविद ससाणे, रॉबिन सालोमन, विश्वास घोडके, आनंद घोरपडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post