नगर : दोन उमेदवारांची माघार; १२ उमेदवार रिंगणात


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. तर आता दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात  यात अपक्ष उमेदवार सुरेश गायकवाड, राजू गुजर व सुभाष शिंदे या तिघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता १४ उमेदवार रिंगणात राहिले होते. माघारीसाठी आजची (७ ऑक्टोबर) अंतिम मुदत होती. त्यात श्रीराम येंडे व संजय कांबळे या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप, शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड, कम्युनिस्ट पक्षाकडून बहिरुनाथ वाकळे, वंचित बहुजन आघाडीकडून किरण काळे, मनसेकडून संतोष नामदेव वाकळे, एमआयएमचे मीर आसिफ सुलतान, बसपाकडून नगरसेवक श्रीपाद छिंदम, अपक्ष श्रीधर दरेकर, संदीप सकट, सुनील फुलसौंदर, सचिन राठोड, प्रतिक बारसे

Post a Comment

Previous Post Next Post