नगर जिल्ह्यात १२ ठिकाणी होणार मतमोजणी


एएमसी मिरर : नगर
उद्या २४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी संबंधित मतदारसंघात मातमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. 
अकोले मतदारसंघाची मतमोजणी कोल्हार-घोटी रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेज येथे होणार आहे. संगमनेर मतदारसंघाची मतमोजणी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी राहाता येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोपरगाव येथील मतमोजणी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, श्रीरामपूर मतदारसंघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय येथे, नेवासा मतदारसंघाची मतमोजणी नवीन शासकीय गोडावून सेंट मेरी स्कूल जवळ, मुकींदपूर येथे होणार आहे.
शेवगाव मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, राहुरी मतदारसंघाची मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, पारनेर मतदारसंघाची मतमोजणी न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर, अहमदनगर शहर मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. ४, एमआयडीसी नागापूर येथे, श्रीगोंदा मतदारसंघाची मतमोजणी पेडगाव रोडवरील शासकीय गोदाम येथे तर कर्जत-जामखेड मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय येथील शासकीय गोडावून येथे होणार आहे.
मातमोजणी केंद्रावर पोलिस प्रशानसनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post