जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा : जिल्हाधिकारी द्विवेदी


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी आज नगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजपर्यंत अवघे 21 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अवघे 21 टक्के मतदान 11 वाजेपर्यंत झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात 71 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन करतांनाच मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदान जास्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात सकाळपासून मतदान सुरू झालेले असताना मतदानाचे प्रमाण कमी आहे. सकाळी 11 वाजपर्यंत 21 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानावर पावसाचे सावट असल्याने अनेकांनी अद्याप घरातून बाहेर न पडणेच पसंत केले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना आवाहन केले जात आहे. दरम्यान, दुपारी दीड वाजेपर्यंत नगर जिल्ह्यात सुमारे ३१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post