व्यवसाय वृद्धीसाठी पोषक वातावरण तयार करण्यावर भर : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
नगर शहरात विकासाचा अजेंडा घेऊन काम करत असताना शहरातील उद्योग व्यवसाय वाढावेत यासाठी पोषक वातावरण निर्मितीवर आपण भर दिलेला आहे. त्यामुळे काही काळ उतरती कळा लागलेल्या नगर शहरातील उद्योग व्यवसायाला आता उभारी येऊ लागली आहे. उद्योग व्यवसाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण नेहेमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा देवून त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. यानिमित्त आयोजित बैठकीत आ.जगताप बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, उपाध्यक्ष गोरख पडोळे, संतोष बलदोटा, अजित पवार, अविनाश घुले, हिरालाल खुबचंदानी, मनोज बलदोटा, पंचम पडोळे, मनिष चोपडा, मारुती पवार, उमेश धोंडे, भुपेंद्र रासने, शुभम जगताप, सुदाम वांढेकर, अभिजित शहा, सुमित पितळे, नितिन डाके, ओेंकार वाघस्कर, आकाश घाटविसावे, शामल लोहिया, आकाश गांधी, आशिष भळगट, राज पटवा, लक्ष्मण मोटवाणी, अतुल रच्चा, भुषण म्हसे, प्रविण गाली, करण वाघमारे, वैभव बारसे, राहुल पटारे, साजिद खान आदी उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले की, शहरात अनेक तरुणांना व्यवसाय करताना विविध प्रकारच्या अडचणी येतात. त्या सोडविण्याचे काम आपण नेहेमीच केलेले आहे. आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून व्यवसाय करु इच्छिणार्‍या आणि सध्या व्यवसाय करत असलेल्या सर्वच युवकांच्या अडचणी सोडविल्या जातील असेही ते म्हणाले.
गोरख पडोळे म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांनी मोबाईल व्यावसाय करणार्‍या तरुणांना संघटीत करुन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचे तसेच अडीअडचणी सोडविण्याचे काम केलेले आहे. त्यामुळेच अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्यावतीने त्यांना पाठिंबा दिला असून असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आ.जगताप यांच्या प्रचारात सक्रीय राहणारआहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post