विरोधी उमेदवाराचा बालेकिल्लाच जुगाराचा अड्डा : आ.अरुण जगताप


एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना संपूर्ण नगर शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक संघटना, सर्व जाती-धर्मांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. 5 वर्षात केलेल्या विकास कामांचे व्हीजन घेऊन आ.संग्राम जगताप निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांचा विजय निश्‍चित आहे. विरोधी उमेदवाराकडे कोणतेही व्हीजन नसून, प्रचाराचे मुद्देही नाहीत. त्यामुळे जनता त्यांना थारा देणार नाही. नगर शहराच्या विकासासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. जाती-पातीत तेढ निर्माण करुन दंगली घडविणे, कुटूंबांमध्ये भांडण लावणे एवढाच त्यांचा धंदा आहे. आमदारकीच्या 25 वर्षांच्या काळात त्यांनी खालच्या दर्जाचे राजकारण करत एकही ठोस विकास काम केले तर नाहीच, शिवाय एकाही कार्यकर्त्याला त्यांनी नेता केले नाही. त्यांचा बालेकिल्ला असलेला नेता सुभाष चौक हा जुगाराचा व अवैध धंद्यांचा अड्डा आहे, असा घणाघाती आरोप आ.अरुण जगताप यांनी केला.काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ डोके कुटूंबियांच्यावतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.अरुण जगताप यांनी आ.संग्राम जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी वृक्षमित्र बलभिम डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माणिक विधाते, कुंडिलक दरेकर, चंद्रक़ांत गाडे, संजय गाडे, दाळमंडई मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, बी.एन.शिंदे, दगडू पवार, अ‍ॅड.शारदा लगड, नगरसेविका शितल जगताप, ज्योती गाडे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संजय गाडे, अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड.भुषण बर्‍हाटे, दिलीप मिस्किन, बापूसाहेब गिरवले, बाळासाहेब जगताप, सुर्यकांत गाडे, बबन औटी, अ‍ॅड.रविंद्र शितोळे, विठ्ठल गुंजाळ, दशरथ खोसे, प्रकाश भागानगरे, विनित पाउलबुधे, सुमतीलाल कोठारी, अनिल मुरकुटे आदी उपस्थित होते.
बापूसाहेब डोके म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 5 वर्षात नगर शहरात केलेली विकास कामांमुळे शहरातील बरेचशे प्रश्‍न सुटले आहेत. वयाने तरुण असलेले आ.संग्राम जगताप यांचा विकासाचा दृष्टीकोन आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय संग्राम जगताप आहेत. त्यामुळे शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी नगर शहरातून संग्राम जगताप यांना पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
माणिक विधाते यांनी आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राजेंद्र चोपडा यांनीही मनोगत व्यक्त करुन संग्राम जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अ‍ॅड.शिवजीत डोके यांनी केले. तर प्रसाद डोके यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post