नगर : वीरशैव लिंगायत समाजाचा आ.संग्राम जगताप यांना पाठींबा


एएमसी मिरर : नगर
वीरशैव लिंगायत युवा आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने आ.संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठींबा देण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष संजय कोरपे, पंचम ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष बीडवाई, समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते नंदकुमार फिरोदे, सुनील साखरे, गणेश वाळेकर, अमित बेद्रे, अमोल राळेगणकर, समाजाचे सल्लागार रवींद्र बेंद्रे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अविनाश घुले आदी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र बेंद्रे म्हणाले, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले समाजाचे प्रश्न आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडे मांडले. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही. मात्र आ.संग्राम जगताप यांनी त्वरित वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा महत्वाचा प्रश्न जमीन उपलब्ध करून सोडवला आहे. तसेच अनेक इतर प्रश्नही मार्गी लावले आहेत. या निवडणुकीसाठी आमच्या समाजाचा पूर्ण पाठींबा आ.संग्राम जगताप यांना देत आहोत.
आ.संग्राम जगताप म्हणाले, शहरात वीरशैव लिंगायत समाजाशी जगताप कुटुंबाचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. महापौर असताना व आता आमदार म्हणून या समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी समाजाने मला पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आगामी काळात तरुणांच्या साथीने नगर शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी मी असाच प्रयत्नशील असणार आहे.
प्रास्ताविक सुनील साखरे यांनी सादर केले. वसंत बैचे यांनी आभार मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post