तोफखाना, बोल्हेगावात आ. संग्राम जगताप यांचा झंझावात


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या तोफखाना आणि बोल्हेगाव या परिसरात झंझावाती प्रचार फेरी काढली. शिवसेनेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीत सहभाग घेतला.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये भावनिक आवाहन करत विकासाच्या मुद्याला सोयीस्कररित्या बगल दिली जात होती.त्यामुळे 25 वर्षे नगर शहर विकासाबाबत मागे राहिले. विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी 5 वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न केले. येत्या काळात नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे. तोफखाना परिसरातील प्रचार फेरीत माजी उपमहापौर दीपक सूळ, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख राजेंद्र बोगा, दिलदारसिंग बीर, आरिफ शेख, प्रशांत धलपे, नानासाहेब बत्तीन, सारंग पंधाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post