'प्रश्नांची जाण असलेल्या आ. संग्राम जगताप यांना पुन्हा निवडून द्यावे'


एएमसी मिरर : नगर
आ. संग्राम जगताप यांना नगरसेवक, दोन वेळा महापौर म्हणून काम करण्याचा चांगला अनुभव आहे. गेली पाच वर्षे ते आमदार आहेत. महापौर व आमदार म्हणून काम करतांना त्यांनी शहराच्या विकासात भर घातली आहे.  कामाच्या अनुभवामुळे त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे. शहरात विकासकामे करण्याबरोबरच नागरिकांची प्रश्नही आमदार संग्राम जगताप सोडवत असल्याने नागरिकांनी, महिलांनी व युवकांनी संग्राम जगताप यांना पुन्हा आमदार होण्याची संधी द्यावी, असे आवाहन नगरसेविका शीतल जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप याही प्रचारात सक्रिय झाले असून शहरातील विविध भागात महिला मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आ. संग्राम जगताप यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती महिलांना देऊन राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहन त्या करत आहेत. कायनेटिक चौक, केडगाव भागातील विविध वसाहतींमध्ये प्रचारफेरी काढल्या. यावेळी महिलांशी संवाद साधला. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना आमदार जगताप यांनी राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी परिसरातील सांगितलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तात्काळ स्थानिक प्रभागातील नगरसेवकांना फोन करून सूचना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post