संग्राम जगताप यांना आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा


एएमसी मिरर : नगर
नगर जिल्ह्यात शिवसेने विरोधात बंड पुकारुन शहरातील आरपीआयचे पदाधिकारी व आंबेडकरी विचारांच्या विविध 50 संघटनांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहिर केला. काही दिवसापासून आरपीआयचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शिवसेने विरोधात तीव्र नाराजी होती. शिवसनेने देखील या कार्यकर्त्यांची मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला आहे.
दलित पँथर्सचे ज्येष्ठ नेते विजयकांत चाबुकस्वार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आरपीआय (आठवले) गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), आरपीआय (गवई), भीमशक्ती, भारतीय दलित महासंघ, लोकशाही विचार मंच, शाहू बॉईज ग्रुप, बहुजन रयत परिषद, संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, वीर लहुजी वस्ताद, मातंग समाज संघटना, अखिल भारतीय गवळी समाज संघटना आदींसह चळवळीतल्या 50 संघटनांनी आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा दर्शवून त्यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
आरपीआयचे अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्याप्रसंगी सुरेश बनसोडे, जेव्हिअर भिंगारदिवे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, अशोक केदारे, दीपक मेढे, रमेश भिंगारदिवे, संदीप वाघमारे, कौशल गायकवाड, नितीन कजबेकर, महेश भोसले, सुनील शेत्र, सुमेध गायकवाड, किशोर बोरुडे, संजू जगताप, समीर भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, दगडू पवार, अजिंक्य भिंगारदिवे, सुनील उमाप, विजू वडागळे, नाथा अल्लाट, अनुसया भाकरे, सुशांत म्हस्के, दानिश शेख, बंटी भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, निलेश बांगरे, पप्पू पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन महेश भोसले यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post