विकासकामांमुळे माझा विजय निश्चित : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील मतदारांचा प्रतिसाद वाढत आहे. शहराचा आमदार या नात्याने शहराच्या सर्व भागात केलेले विकास कामे सर्व जनतेपर्यत पोहचवले आहेत. नगर शहराला विकासाचा चेहरा देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. यासाठी मला पुन्हा एकदा जनतेच्या साथीची गरज आहे. आपण केलेल्या विकासकामांमुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी प्रभाग १५ व १६ मधील मल्हार चौक, कायनेटिक चौक परिसरातील वसाहीतींमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. रविश कॉलनी मधील सिद्धिविनायक गणपती मंदिरात त्यांचे कॉलनीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका नलिनी भडकवाडे, विजय गव्हाळे, दत्ता खैरे, संभाजी पवार, हेमंत थोरात, अभय श्रीश्रीमाळ, प्रमोद कुलकर्णी, प्रकाश हाफसे,  बी.एस.लोखंडे, दीपक लोंढे, संतोष चांबूटे, मनोज नन्नवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post