दडपशाहीला भीक न घालता शिवसेनेच्या पाठिशी उभे रहा : अभिषेक कळमकर


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार आता संपत आहे. परंतु, प्रचाराचा शेवट होत असताना नागरिकांनीही शहरातील विषवल्लीचा शेवट करण्याचा निश्चय करावा. माझ्याबाबत घडलेला प्रसंग सर्वांना माहिती आहे. तोंडात विकासाच्या गोष्टी आणि काम सराईत गुंडासारखे, असा विरोधाभास आता संपुष्टात आणावा. मतदानाला काही तास उरल्याने गुंडगिरी, दडपशाही, आमिषे दाखवून तुम्हाला मतदानासाठी प्रवृत्त करणारी अदृश्य यंत्रणा ते कार्यरत करतील, त्याला अजिबात भिक घालू नका, अशा शब्दात अभिषेक कळमकर यांनी विरोधकांवर निषाणा साधत शिवसेनेच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.


अभिषेक कळमकर म्हणाले की, तुमचे मत अतिशय अमूल्य आहे. मतदानात भल्याभल्यांना धडा शिकवण्याची ताकद आहे. ती ताकद नगरकरांनी जरूर वापरावी व अनिलभैय्यांच्या रुपाने सर्वसामान्यांच्या पाठिराख्यालाच मतदान करावे. मी धाडस दाखवून या प्रवृत्तीविरोधात उभा ठाकलो आहे. संपूर्ण नगर शहराची या चुकीच्या प्रवृत्तीपासून सुटका करायची आहे. आता त्यांना बास म्हणण्याची वेळ आली आहे. प्रचारादरम्यान मला सर्वत्र शिवसेनेविषयी आस्था पहायला मिळाली, विश्वास पहायला मिळाला. त्यामुळे आज मी घेतलेल्या निर्णयाबाबत मी समाधानी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post