विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी जनता शिवसेनेच्याच पाठिशी : अनिल राठोड


एएमसी मिरर : नगर
आपले प्रश्न, अडचणी मनमोकळेपणाने आणि बिनधास्तपणे केवळ शिवसेनेकडेच मांडू शकतो, हे नगरच्या जनतेला माहिती आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यास शिवसेना-भाजप सक्षम आहे, हा विश्वास जनतेच्या मनात कायम आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी जनता शिवसेनेच्याच पाठिशी ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांनी केले.
मार्केटयार्ड परिसरातील भुसार मार्केटमध्ये नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही कायम जनतेला सुविधा देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. नगर शहरातून शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांना आपण विजयी करून विधानसभेत पाठवले तर सत्तेतला आमदार या नगर शहरात असेल. शहराला मंत्रिपदही मिळू शकते. या माध्यमातून शहराच्या विकासाला दिशा मिळेल. महायुतीच्या माध्यमातून अनेक कामे शहरात करता येतील. त्यामुळे नगरकरांनी ही संधी सोडू नये. महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना अधिकाधिक मताधिक्क्याने निवडून द्यावे. आम्ही सर्व एकत्र मिळून या नगर शहरात सक्षम विकासाचे काम करू, असे त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post