सारसनगरमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ का येते?


एएमसी मिरर : नगर
शहरात केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारतर्फे विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 
मात्र, लोकप्रतिनिधींच्या नियोजनाअभावी या योजना नगर शहरात पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सारसनगर सारख्या भागात आजही नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ का येते? असा सवालही शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी उपस्थित केला आहे.
आज केंद्रात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे, आणि आता राज्यातही भाजप-शिवसेनेची सत्ता येणार आहे. आपल्या या भागाच्या विकासासाठी शिवसेना-भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अनिल राठोड यांनी सारसनगर भागातून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, सुनिल त्रिपाठी, दिपक खैरे, परेश लोखंडे, डॉ.श्रीकांत चेमटे, विशाल वालकर आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले, शहराच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मनपात शिवसेनेची सत्ता असतांना शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागाचा विकास झाला आहे. परंतु सारसनगरच्या विकासाबाबत विरोधकांनी खोडा घालण्याचेच काम केल्यामुळे या भागातील पाणीप्रश्न कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post