शहरातील महिलावर्ग अनिलभैय्यांच्याच पाठिशी : माजी महापौर कदम


एएमसी मिरर : नगर
महिलांना संरक्षण आणि त्यांचा सन्मान यासाठी शिवसेनेने कायम आग्रही भूमिका घेतलेली आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला. शिवसेनेच्या वचनमान्यातही महिला सक्षमीकरण आणि बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड हेही शहरातील विविध महिला संघटनांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या कार्यात मदत करत असतात. त्यामुळेच आज शहरातील महिलावर्ग अनिलभैय्यांच्याच पाठिशी असल्याचा विश्वास माजी महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केला.महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ महिलांनी माळीवाडा भागातून प्रचारफेरी काढली. यावेळी शशिकला अनिल राठोड, नगरसेविका मंगल लोखंडे, माजी नगरसेविका अनिता राठोड, भारती कदम, कोठारी, रचना राठोड आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.
महापौर कदम म्हणाल्या की, नगर शहरात शिवसनेनेमध्ये महिलांचा नेहमीच सन्मान केला जातो. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य महिलेलाही महापौर होण्याचा मान अनिल राठोड यांनी मिळवून दिला. आपण महापौर असतांना केंद्र व राज्यात भाजप-सेनेचे सरकार असल्याने अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने अनेक योजनांसाठी मोठा निधी आणला. याही निवडणुकीत राज्यात पुन्हा सेना-भाजपाचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post