पुढचा पालकमंत्री नगर शहरात असेल : खासदार सुजय विखे


एएमसी मिरर : नगर
लोकसभा निवडणुकीत सर्व नगरकर महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. मात्र, शहरात अनेक विकासकामे करायची आहेत. सरकार महायुतीचेच येणार आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. मुखमंत्री आणि राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महायुतीचे सर्व उमेदवार निवडून दिल्यास मंत्रालयात आपली ताकद वाढणार आहे. शहरात महापौर आपला, खासदार आपला आहे. शिवसेनेचा आमदार निवडून दिला तर पुढे पालकमंत्री ही नगर शहरात असेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.


महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपनगर येथील श्रीराम चौक, एकविराचौक, पाईपलाईन रोड या भागातून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. उमेदवार अनिल राठोड, माजी खासदार दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, विक्रम राठोड, अभय आगरकर, दिलीप सातपुते, सुभाष लोंढे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले की, आम्ही फक्त गप्पा मारणार नाही. तर विकासाच्या जोरावर नगर शहरात बदल घडवून दाखवू. दोन्ही लोकप्रतिनिधी महायुतीचे असले तर नगर शहराच्या विकासात कोणी खोडा घालू शकत नाही. येत्या 21 ऑक्टोबरला नगरच्या जनतेने 2014 ची केलेली चूक दुरुस्त करावी. अन्यथा पुढच्या पाच वर्षाच्या नगरच्या दुरावस्थेला तुम्हीच जबाबदार ठरताल. आज नगर शहरात भाजपा-शिवसेनेचा आमदार असता, तर शहराचा चेहरामोहरा तुम्हीच बदललेला पहिला असता. आता या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा संधी मिळाली आहे. चूक दुरुस्त करून अनिल राठोड यांना निवडून द्यावे व शहराच्या विकासात शिल्पकार होण्याचे भागीदार व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post