'जनहिताच्या कामांमुळेच अनिल राठोड सलग पाच वेळा आमदार झाले'


एएमसी मिरर : नगर
अनिल राठोड यांना 25 वर्षांच्या कामाचा हिशोब मागणार्‍यांनी राज्यात 20 वर्षे काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना किती निधी आणला होता, हे सांगावे. उमेदवारांची वडील 7 वर्षे नगराध्यक्ष होते. अनेक वर्षे विधान परिषदेचे आमदार आहेत. उमेदवार चार वर्षे महापौर होते. आता पाच वर्षे आमदार आहेत. या काळात त्यांनी नगरकरांसाठी काय केले? असा सवाल नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला आहे. शहरात शिवसेनेने केलेल्या जनहिताच्या कामांमुळे जनतेने 25 वर्षे सलग पाच वेळा अनिल राठोड यांना आमदार केले, असेही ते म्हणाले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रोफेसर चौक येथे चौक सभा घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सदाशिव देवगावकर, बाबा सानप, नरेंद्र कुलकर्णी, मिलिंद गंधे, मुकुंद गंधे, अभिजित दरेकर, रवी वाकळे, अक्षय कातोरे, गिरीष जाधव, पराग गुंड, ओेंकार पछाडे, महेश आनेचा, पांडुरंग दातीर, डॉ. चंद्रकांत बारस्कर आदी उपस्थित होते.
शिवसेनेने 25 वर्षे नगरच्या नागरिकांना काय दिले, हे त्यांना माहिती आहे. मात्र, मागील पाच वर्षात नगरमध्ये विकास तर झालाच नाही. उलट दहशत वाढली. पोलिस अधिक्षक कार्यालय फोडले गेले. त्यामुळे नगरचे नाव संपूर्ण देशात बदनाम झाले, असा आरोपही गाडे यांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post