सारसनगरची बदनामी करु नये, टँकर एक वर्षापूर्वीच बंद झालेत : प्रकाश भागानगरे


एएमसी मिरर : नगर
आमदार संग्राम जगताप यांनी मंजूर करुन आणलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शांतीनगर झोन अंतर्गत फेज-२ योजनेच्या जलवाहिन्यातून गेल्या एक ते दीड वर्षापासून सारसनगर परिसरात मुबलक पाणी पुरवठा सुरु आहे. तेव्हापासून या भागातील टॅंकरही बंद झाले आहेत. संपूर्ण शहरात आमच्या परिसराची बदनामी करुन स्वतःची राजकीय पोळी उपनेत्यांनी भाजू नये, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला लगावला आहे.
शिवसेनेने सारसनगर परिसरातून प्रचारफेरी काढत या भागात अद्यापही टँकरने पाणीपुरवठा कसा? असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या भागाच्या बदनामीचा जबाब येणाऱ्या निवडणूकीत मतदानातून सारसनगर भागातील नागरिक देतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post