भाजपचे १२५ उमेदवार जाहीर; वाचा संपूर्ण यादी


एएमसी मिरर : वेब न्यूज 
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रराजे आणि कराड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी उमेदवारी दिली आहे.
विशेष म्हणजे ५२ विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा तिकीट दिले आहे. तर १२ आमदारांना घरी बसवले आहे. तसेच १२ महिला आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

घाटकोपरमधून राम कदम, पुण्यातील कसबा पेठ येथून मुक्ता टिळक, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख, परळीमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. सांगलीतून सुधीर गाडगीळ, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर यांना उमेदवारी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post