'पवारांना पाटील कळलेलेच नाहीत'


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही. पवारांना पाटील कळलेलेच नाहीत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये अडकवून ठेवल्याचं शरद पवार सांगत आहे. पण त्यांना पाटील कळलेलेच नाहीत. पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही. मनसेला आघाडीत घेतलं नाही. पण कोथरुडमध्ये माझ्याविरोधात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली, असेही ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post