भाजपची चौथी यादी जाहीर, तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात  मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाल्याचे चित्र आहे. बोरिवलीमध्ये विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मंत्री राहिलेल्या प्रकाश मेहता यांचा देखील पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे अजूनही वेटिंगवर आहेत. कुलाबा मतदारसंघामधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत चार उमेदवार घोषित केले आहेत. तिन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 143 उमेदवार घोषित करण्यात आले होते. भाजपकडून आता एकूण 150 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून ही भाजपची जागावाटपाच्या हिशोबाने अंतिम यादी असल्याचे बोलले जात आहे.

भाजप उमेदवारांची चौथी यादी
बोरिवली - सुनिल राणे
मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
काटोल- चरणसिंह ठाकूर
घाटकोपर पूर्व - पराग शाह
तुमसर - प्रदीप पडोले
कुलाबा - राहुल नार्वेकर
नाशिक पूर्व - राहुल डिकळे

Post a Comment

Previous Post Next Post