एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीमध्ये भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीमध्येही माजी मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे, प्रकाश मेहता यांच्या नावांचा समावेश झालेला नाही.
भाजपने आतापर्यंत 143 उमेदवारांची घोषणा केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत.

तिसऱ्या यादीतील उमेदवार
रामटेक – मल्लिकार्जून रेड्डी
मालाड पश्चिम – रमेश ठाकूर
शिरपूर – काशिराम पावरा
साकोली – परिणय फुके