शिवसेनेबरोबर आमचं जे ठरलंय त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत : मुख्यमंत्री


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात शिवसेना भाजपा युतीला चांगलं यश मिळालं आहे. त्याचं विश्लेषण आता करणार नाही. परंतु शिवसेना भाजपाच्या सत्तास्थापनेइतके संख्याबळ आहे. परंतु बंडखोरी करून विजय मिळवलेल्या १५ जणांशी आपला संपर्क झाला असून ते सरकार स्थापनेसाठी मदत करणार आहेत. शिवसेनेबरोबर आमचं जे ठरलंय त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. काय ठरलं आहे ते योग्य वेळी आम्ही उघड करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 
तिकिट वाटपानंतर काही जणांनी आमच्याविरोधात बंडखोरी केली. परंतु ते सर्व आमचेच आहेत. त्यांपैकी १५ जणांशी संपर्क झाला असून आता ते सरकार स्थापनेसाठी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शिवसेनेबरोबर आमचं जे ठरलंय त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. काय ठरलं आहे ते योग्य वेळी आम्ही उघड करू, असं त्यांनी नमूद केलं.
राज्यात महायुतीला जनतेनं अभूतपूर्व यश दिलं आहे. जनतेनं पुन्हा सरकार चालवण्याची संधी दिली आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मिळालेलं यश मोठं आहे. गेल्यावेळी आम्ही २६० जागा लढलो होतो. त्यात १२२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मित्रपक्षांसह १६४ जागा लढलो आणि चांगलं यश मिळालं आहे. दोन्हींची तुलना केली तर आमची कामगिरी चांगली आहे. गेल्या वेळी आमचा स्ट्राईक रेट ४७ टक्के होता. यावेळी तो ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे २६ टक्के मते भाजपाला मिळाली आहेत. अनेक मंत्र्यांचा आणि उमेदरांचा पराभव झाला आहे. पण, पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांचा झालेला पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. असा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. हे पराभव का झाले याचं आम्ही चिंतन करू, असंही त्यांनी नमूद केलं.

Post a Comment

Previous Post Next Post