एएमसी मिरर : वेब न्यूज
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम
शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. सिद्धटेक येथे शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.
कर्जत - जामखेड मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे. शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी ही माहिती दिली. राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार रिंगणात आहे. राज्यातील 'हाय वोलटेज' लढतींपैकी एक असलेल्या या मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

Post a Comment