महायुतीची औपचारिक घोषणा; बंडखोरांना जागा दाखविण्याचा इशारा


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याचा कालावधी पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बंडखोरांना महायुतीत कोणतेही स्थान नसल्याचे सांगत समजावूनही न ऐकल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून न ठेवता त्यांना शेतात पाणी देणार असल्याचेही ते म्हणाले.
महायुतीमध्ये भाजप १५० शिवसेना १२४ तर मित्रपक्ष १४ जागांवर लढत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर तर काही त्यांच्या चिन्हावर लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले... 
 • लोकसभेवेळी महायुतीची घोषणा केली
 •  आम्हा सर्वांना थोड्या प्रमाणात तडजोड करावी लागली आहे
 •  महायुती प्रचंड मतांनी निवडून येईल
 • आतापर्यत कोणाला मिळाला नाही असा प्रतिसाद आम्हाला मिळेल
 • आदित्य ठाकरेंचे मी  विशेष स्वागत करतो
 • मुंबईमध्ये सर्वांधिक मतांनी विजयी होतील
 • वरळीमधून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
 • त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
 • बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास युतीमध्ये स्थान राहणार नाही 
 • गेल्या पाच वर्षाला राज्याला गती दिली आहे. 
 • बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत 
 • दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न 
 • शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून ठेवून चालणार नाही
 • महाराष्ट्राच्या मनातील महायुती स्थापन झाली आहे. 
 • मित्रपक्षांना १४ शिवसेनेला १२४ तर  भाजप १५०  जागांवर 
 • काहींनी  आपल तिकिट घेतल आहे, काहींनी नाही 
 • लहान भाऊ काय आणि मोठा भाऊ काय आम्ही भावाचं नातं टिकवलं! 

Post a Comment

Previous Post Next Post