विधानसभेसाठी 'महाआघाडी'चा जाहीरनामा प्रसिद्ध


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय याचबरोबर तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व मित्र पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

जयंत पाटील यांनी सांगितले की, हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्यावतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणवर मेहनत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगीकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे. आमच्या मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये विशेष सुचना केलेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post