भाजपाला ईडीचा पाठिंबा; कॉंग्रेस प्रवक्त्यांचे खोचक ट्वीट


एएमसी मिरर : न्यूज
‘ब्रेकिंग न्यूज…सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा’ असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावार निशाणा साधला आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी उशीर होत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी ईडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सत्ताधारी भाजपा ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला होता. राज्यात भाजपाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा याच मुद्द्यावरुन भाजपाला टोला लगावला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद निर्माण झालेला असतानाच आता निवडणुकीच्या आधी ज्याप्रमाणे भाजपाने ईडीची मदत घेतली तशीच मदत आता सत्ता स्थापनेसाठीही घेणार असल्याची बोचरी टीका काँग्रेसने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post