एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये पहिल्या फळीतील अनेक दिग्गज नेत्यांना या यादीत स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा पहिल्या यादीत समावेश नसल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाकडून तब्बल १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १२५ उमेदवारांच्या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव नाही. तसेच विनोद तावडे प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
Post a Comment