नगर : मतदानयंत्रे बंदोबस्तात मतदारसंघाकडे रवानाएएमसी मिरर : नगर 
जिल्हा निवडणूक प्रशासनाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत मतदानयंत्रे रवाना केली आहेत. जिल्ह्यात विधानसभेसाठी तीन हजार 722 मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण सुमारे 16 हजार यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येत यंत्रांची संख्या 20 ते 30 टक्के अधिक
21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रे मागील महिन्यातच निवडणूक शाखेकडे दाखल झालेली होती. एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून संबंधित विधानसभा मतदारसंघात ही यंत्रे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. संबंधित मतदारसंघाचा राजपत्रित अधिकारी, पोलीस व इतर कर्मचार्‍यांसह वाहनातून ही यंत्रे रवाना झाली. 6 हजार 535 बॅलेट युनिट, 4 हजार 712 कंट्रोल युनिट व 4 हजार 871 व्हीव्हीपॅट अशा एकूण 16 हजार 118 यंत्रांची सरमिसळ (रॅण्डमायझेशन) करून ही यंत्रे रवाना करण्यात आली आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post