एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच आईची लेकरं आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
सोलापुरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील.
Post a Comment