खट्टर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, चौटालांनीही घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ


एएमसी मिरर : वेब न्यूज
मनोहर लाल खट्टर यांनी आज(दि.२७) सलग दुसऱ्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाची व गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जननायक जनता पार्टीचे (जजपा) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली.
आजच्या शपथग्रहण सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली. शपथविधीसाठी जजपा नेते दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला हे देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यापूर्वीच चौटाला यांना दोन आठवड्यांची फर्लो मंजूर झाल्याने त्यांची तिहार कारागृहातून सूटका झाली व ते शपथविधीला उपस्थित राहिले. शपथग्रहण कार्यक्रमाला काँग्रेस नेता भूपिंदर सिंह हुड्डा, अकाली दलाचे नेता प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर बादल हे देखील पोहोचले होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post