विकासकामांच्या बळावर आपण ही निवडणूक सहजपणे जिंकणार : राम शिंदे


एएमसी मिरर : नगर 
तालुक्यातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात व सेवा संस्था राळेभात यांच्या ताब्यात आहेत. दोन्हीची ताकद एकत्र केली असता मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आपण ही निवडणूक सहजपणे जिंकणार आहोत, असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात व माझी सेटींग होती. राजकारणात देवाण-घेवाण होत असते . त्यामुळे येणारी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार आहे, असेही ते म्हणाले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे चेअरमन, सचिव, संचालक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, नगराध्यक्ष निखील घायतडक, मनोज राजगुरू, संचालक सुधीर राळेभात, मकरंद काशिद, करण ढवळे, सुभाष जायभाय, बाजीराव भोंडवे, पृथ्वीराज वाळुंजकर, अमोल राळेभात, पांडुरंग सोले, विठ्ठलराव राऊत, बाळासाहेब शिंदे, अंकुश कोल्हे, भारत काकडे, अरूण वराट, कैलास वराट, दादासाहेब वारे, बबन ढवळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post