रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज झाला बाद! कर्जत-जामखेडमध्ये खळबळ


एएमसी मिरर : नगर
राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड मतदारसंघातील रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका पाटोदा) या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद (अवैध) झाला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडविली आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात एकूण 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका पाटोदा), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले आहेत. रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र ठरले. तर आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीचा पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज होता. मुख्य उमेदवार राम शिंदे यांचा अर्ज मंजूर झाल्याने व अपक्ष उमेदवारीसाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार व राम शिंदे यांच्या नावाने डमी उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील वैध उमेदवारः

रामदास शंकर शिंदे - भारतीय जनता पार्टी
रोहित राजेंद्र पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष
शंकर मधुकर भैलुमे - बहुजन समाज पार्टी
अरुण हौसराव जाधव - वंचित बहुजन आघाडी,
अप्पासाहेब नवनाथ पालवे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
सोमनाथ भागचंद शिंदे - जनहित लोकशाही पार्टी
अशोक सर्जेराव पावणे - अपक्ष
उत्तम फकिरा भोसले - अपक्ष
किसन नामदेव सदाफुले - अपक्ष
गोविंद लक्ष्मण आंबेडकर - अपक्ष
बजरंग मनोहर सरडे - अपक्ष
महारुद्र नरहरी नागरगोजे - अपक्ष
राम रंगनाथ शिंदे - अपक्ष
सुमीत कन्हेय्या पाटील - अपक्ष
शहाजी राजेंद्र काकडे - अपक्ष
ज्ञानदेव नरहरी सुपेकर - अपक्ष

Post a Comment

Previous Post Next Post