नगर : किरण काळेंना ‘वंचित’ची उमेदवारी जाहीर


एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी काळे यांच्या नावाची घोषणा मुंबईमध्ये केली आहे. विकासाच्या मुद्द्यावर व गुंडगिरी प्रवृत्तीविरोधात आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगर शहर गेल्या तीस वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. म्हणूनच आपण नगरकरांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर नगर शहराची निवडणूक लढणार असून या माध्यमातून नगरकर परिवर्तनाचं एक मोठ जनांदोलन उभे करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माझी उमेदवारी कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा कुणा एकाच्या विरुद्ध नसून जातीयवादी पक्ष आणि दहशत, गुंडगिरीच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. या शहरात आज पर्यंत दोन नेतृत्वांना मतदारांनी गेल्या तीस वर्षात संधी दिली. माजी आमदारांना पाच-दहा नव्हे तर तब्बल पंचवीस वर्ष मोठ्या अपेक्षेने संधी दिली होती. परंतु विकास तर दूरच त्यांनी शहराची दुर्दशा करून टाकली, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांना, ज्येष्ठांना बरोबर घेऊन आम्ही एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ, असे काळे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post