भाजप, शिवसेना महायुतीला लहुजी शक्तीसेनेचा पाठिंबा


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने भाजप, शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला आहे. लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे व जिल्हासंपर्क प्रमुख अरुण बोरुडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सोपविले.
यावेळी जिल्हा सचिव संतोष शिंदे, कार्याध्यक्ष सुनिल सकट, संजय खुडे, जयवंत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, संतोष उमाप, किरण शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षापासून लहुजी शक्ती सेना मातंग समाजाच्या वंचित प्रश्‍नावर संघर्ष करीत आहे. आघाडी सरकारने मातंग समाजाचे प्रश्‍न सोडवण्याची भूमिका घेतली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, लहुजी शक्तीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, कोअर कमिटी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांच्यासह राज्य कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकित मातंग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन, मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन मिळाल्याने लहुजी शक्ती सेनेने भाजप, शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहिर केला आहे. 
लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व मातंग समाजबांधवांना भाजप, शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तर मातंग समाजाचे प्रश्‍न सुटेपर्यंत लहुजी शक्ती सेनेची संघर्षाची भूमिका कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post