राज्यात ‘या’ मतदारसंघात घडला नवा इतिहासएएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाने नवा इतिहास घडवला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. तसेच या मतदारसंघात 'नोटा'ला दुसऱ्या क्रमांकाची मात पडली आहेत.
राज्यात अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर काही उमेदवार हे खूपच थोड्या फरकाने निवडून आले आहेत. जनतेचा विश्वास जिंकत निवडणुकीत मोठ्या फरकानं निवडून येणं ही उमेदवारासाठी मोठी बाब असते. राज्यात अशाच प्रकारे सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मतं मिळवून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम विजयी झाले आहेत. कदम १ लाख ६२ हजार ५२१ इतके मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. त्यांना १७१४९७ मते मिळाली आहेत. त्यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांना ८ हजार ९७६ मते पडली.
दरम्यान, राज्यात विश्वजीत कदम यांच्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालं आहे. दीड लाख मताधिक्य घेऊन त्यांनी भाजपाच्या गोपिचंद पडळकर यांचा पराभव केला.


Post a Comment

Previous Post Next Post