शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष आमदार


एएमसी मिरर : वेब न्यूज

शिवसेनेच्या गळाला आणखी एक अपक्ष आमदार लागला आहे. त्यामुळे विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबंळ आता ६२ वर जाऊन पोहोचले आहे. साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र त्यांनी दिले. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मंजुळा गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंजुळा गावित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रिपदावरून कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सुतोवाच केल्याने उभय पक्षांमधील तणाव वाढला आहे. शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांना अधिकृत कोणताही फॉर्म्युला देण्यात आला, नसला तरी आजपासून महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post