भारताची वाटचाल रशियाच्या मार्गावर : राज ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज


सध्या भारताची वाटचाल रशियाच्या मार्गावर चालली आहे. कारण रशियात हीच परिस्थिती आहे. काही ठराविक उद्योजकांनी सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या. आत्ता भारतात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण थंड बसलो आहोत. निवडणूक हा व्यवसाय होऊन बसला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.


प्रभादेवीच्या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, देशभरात मंदीची लाट आली आहे, बँका बुडत आहेत. देश आर्थिक संकटात आहे. पुढलं वर्ष कसं जाणार ते दिसून येतं आहे. ही जी काही स्थिती निर्माण झालं आहे, ती मानवनिर्मित निर्णयामुळे होतं आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा आकडा खूप मोठा आहे. मात्र तुम्हाला याचा अंदाज येणार नाही. मात्र याचं गणित काढलं तर दिवसाला तीन तासाला एक आत्महत्या, या प्रमाणात शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post