..तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. या सरकारला शेतीचे काही कळत नसल्याचे सांगताना यांना तेल्याही कळत नाही आणि लाल्याही कळत नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधारी भाजपाला लगावला.
राष्ट्रवादीने उत्तम जानकर यांना माळशिरस (राखीव) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांनी आज माळशिरस येथील वेळापूरमधून प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार म्हणाले की, ज्यांनी बँका बुडवल्या त्यांच्यावर हे पांघरून घालत आहेत. भाजपला आलेला सत्तेचा माज उतरवण्यासाठी आघाडीच्या हातात सत्ता द्या.

Post a Comment

Previous Post Next Post