नेवासा, राहुरी, श्रीगोंद्याचे उमेदवार गुलदस्त्यात; राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात नांदगावमधून पंकज भुजबळ यांना तर माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबन शिंदे यांनाच उमेदवारी दिली गेली आहे. माळशिरसमधून स्व. हनुमंत डोळस यांच्या जागी उत्तम जानकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघात अद्याप उमेदवार देण्यात आलेले नाहीत.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली होती. यानंतर लगेच आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत नगर जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर झाले होते. मात्र, अद्यापही नेवासा, राहुरी व श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेले नाहीत. विद्यमान आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी दुसऱ्या यादीतही जाहीर न झाल्याने श्रीगोंदा मतदारसंघात संभ्रम आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्या आणखी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे तिसरी यादी देखील कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

जळगाव शहर- अभिषेक पाटील
बाळापूर - संग्राम गुलाबराव गावंडे
कारंजा - प्रकाश डहाके
मेळघाट - केवळराम काळे
अहेरी - धर्मराजबाबा आत्राम
दिग्रस - मो. तारीक मो. शमी
गंगाखेड - मधूसुदन केंद्रे
कन्नड - संतोष कोळगे
नांदगाव - पंकज भुजबळ
बागलाण - दीपिका चव्हाण
देवळाली - सरोज अहिरे
कर्जत - सुरेश लाड
खेड आळंदी - दिलीप मोहिते
मावळ - सुनील शेळके
पिंपरी चिंचवड - सुलक्षणा शिलावंत
आष्टी - बाळासाहेब आजबे
माढा - बबनदाद शिंदे
मोहोळ - यशवंत माने
माळशिरस - उत्तमराव जानकर
चंडगड - राजेश नरसिंग पाटील

Post a Comment

Previous Post Next Post