'आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. मला पक्षाच्या निर्णयाची अधिक माहिती आहे. आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आम्ही शिंदे साहेबांपेक्षा राष्ट्रवादी जास्त जाणतो, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विलिनीकरणाच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पवारांच्या या भूमिकेनंतर दोन्ही पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
यवतमाळमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकीय व्यक्तींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आणि विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सरकार सीबीआय, आयबीच्या माध्यमातून पुरेपूर करत असल्याचा टीका शरद पवार यांनी केली. विशेष म्हणजे या देशामध्ये सांप्रदायिक विचारातून सत्ता आणि मतं प्राप्त करून घेण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे. काही ठिकाणी झुंडशाही होत आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post