भिंगारला महापालिकेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार : आ.संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
विकासाचे व्हिजन घेऊन राजकारणात काम करीत आहे. मागील पाच वर्षात शहराला विकासात्मक दिशा देण्याचे काम केले. आमदार निधीच्या माध्यमातून भिंगारमध्ये अनेक कामे मार्गी लावली. आमदार निधी काय असतो? हे भिंगारवासियांनी माझ्या कारकिर्दित पाहिले. भिंगारला महापालिकेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये मेळावा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव ईरशाद जहागिरदार, छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद, उद्योजक लॉरेन्स स्वामी, सादिक सय्यद, आर.आर. पिल्ले, संजय सपकाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, भिंगार शहराचा सर्वात मोठा प्रश्न नॅशनल हायवे असून, हा रस्ता सतत पाण्याच्या पाइपलाइनमुळे खराब व्हायचा. तो देखील मार्गी लावण्यात आलेला आहे. जुनाट पाईपलाइन बदलून उत्तम दर्जाचा रस्ता बनविण्यात आला आहे. भिंगारमधील प्रश्न सोडवून विकासात्मक ओळख निर्माण करुन देण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.Post a Comment

Previous Post Next Post