भिंगारच्या खेळाडूंचे क्रीडासंकुलाचे स्वप्न पूर्ण करणार : आ. संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर 
जनतेसमोर विकासाचे व्हिजन घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. गेल्या पाच वर्षात भिंगार शहरात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. अजूनही अनेक कामे बाकी आहेत. भिंगारचा कायापालट करण्यासाठी काम करणार असून येथील युवक, खेळाडूंचे क्रीडासंकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.
भिंगार शहरात त्यांनी प्रचारफेरी काढली. यावेळी 
नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपली भूमिका मांडली.
जगताप म्हणाले की, भिंगार शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला, भुलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी. शहराचा कायापालट करण्यासाठी आपणास पुन्हा एकदा विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद, सदस्य कलिम शेख, सादिक सय्यद, सुरेश मेहतानी, विशाल बेलपवार, सुदाम गांधले, मतिन शेख, मतिन सय्यद, अजिंक्य भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, संजय खताडे, दिपक लिपाणे, प्रविण चव्हाण, अक्षय नागापुरे, प्रविण घावटे, प्रमोद जाधव, तोडमल सर, शाम वाघस्कर, शिवम भंडारी, संपत बेरड, प्रदीप वावरे, लॉरेन्स स्वामी, कॉंग्रेसचे आर.आर.पिल्ले, मुन्ना चमडेवाले, संभाजी भिंगादिवे, पंकज भुतारे, नुर शेख, रोहन बिदे, सारंग पंधाडे, गौरव बोरा, अनिल तेली, कल्पेश तोतरे, उद्धव शिंदे, पापा सारसट आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post