शहराच्या विकासासाठी आ.संग्राम जगताप यांचे ‘व्हिजन 2024’


एएमसी मिरर : नगर
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मागील 5 वर्षात नगर शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडून पुढील पाच वर्षाचे विकासाचे ‘व्हिजन 2024’ नगरकरांसमोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडले आहे. शहराची इमेज बिल्टअप करणारे व्हिजन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने साथ द्यावी, अशी सादर आ.जगताप यांनी नगरकरांना घातली आहे.


माऊली सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी जाहीरनामा सादर केला आहे. आ.संग्राम जगताप म्हणाले की, नगरच्या जनतेने मला मतदान करुन माझ्यावर विश्वास टाकून आमदारकीची जबाबदारी दिली होती. या विश्वासास पात्र राहत नागरिकांना दिलेल्या वचनांची, आश्वासनांची पूर्ती करत विकास कामे करता आली. विरोधी पक्षाचा आमदार असतांनाही सातत्याने शासन दरबारी पाठपुरवठा करुन विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. या निधीतून बरीचशी विकासकामे मार्गी लागली असून, काही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पाच वर्षात प्रत्यक्ष विकास कामांची उभारणी करणार आहे. विकास कामांसाठी माझी जिद्द व चिकाटी आहे. ‘व्हिजन 2024’ सर्व नागरिकांपुढे मांडले आहे. या माध्यमातून शहराची इमेज बिल्टअप होणार आहे, असे ते म्हणाले.


शिवसेनेवर साधला निषाणा
मध्यंतरीच्या काळात काही विघ्नसंतोषी लोकांनी नगर शहराची देशभरात बदनामी केली. कुठल्याही व्यक्तीवर आरोप करताना त्यात शहराचे नाव बदनाम होणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. नगर शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. शहराची बदनामी झाली तर शहराचा विकास रखडणार आहे. त्यामुळे कोणालाही मला किंवा शहरातील एखाद्या व्यक्तीला नावे ठेवायची असतील, आरोप करायचे असतील तर जरुर करावेत, परंतु यात आपल्या नगर शहराचे नाव बदनाम होईल, असे कोणी करु नये, अशा शब्दांत शिवसेनेचा नामोल्लेख टाळून त्यांनी निषाणा साधला.

‘व्हिजन 2024’ मधील महत्वाचे मुद्दे
 • शहराच्या पर्यटन वाढीसाठी चालना देणार
 • शंभर डीपी रस्त्यांचे काँक्रीटीकरण
 • संपूर्ण शहरात सोलर पथदिवे
 • नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही
 • अद्ययावत डिजिटल लायब्ररी
 • महिला सशक्तीकरणासाठी महिलांना गृहउद्योग
 • भिंगारमध्ये क्रीडा संकुल
 • एमआयडीसीचे विस्तारीकरण, आयटीपार्कचा विस्तार
 • स्टार्टअप अहमदनगरच्या माध्यमातून नवउद्योजक निर्माण करणार
 • नगर-पुणे इंटरसीटी रेल्वे सुरु करणार
 • शहरात मोफत वायफाय सुविधा
 • सीना नदीचे सुशोभिकरण

शहरात केलेली विकासकामे
 • 116 कोटी रुपयांची फेज-2 पाणी योजना कार्यान्वित करुन नगर शहराचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडविला.
 • प्रत्येक प्रभागात तसेच विविध भागांमध्येही उद्याने विकसित करण्यावर दिला भर
 • बालिकाश्रम रस्ता, कोठी रस्ता, केडगाव देवी रस्ता काँक्रीटीकरणासाठी 70 कोटी
 • केडगांव ते सारोळा रस्त्यासाठी 2 कोटी 52 लाख
 • केडगांव ते बुरुडगांव रस्त्यासाठी 3 कोटी
 • केडगाव ते कल्याण रोड (लिंकरोड) रस्त्यासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर
 • वारुळाचा मारुती ते निंबळक रस्त्यासाठी निधी मंजूर
 • तपोवन रोडसाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर
 • बुरुडगांवमध्ये विविध योजनांमधून विविध विकासकामे मंजूर
 • बुरुडगांव रोडवरील भिंगार नाल्यावर 1.5 कोटी खर्चून पुलाचे काम
 • नगर शहरातील प्रत्येक चौकात अत्याधुनिक हायमॅक्स व अंतर्गत पथदिवे
 • सावेडी, केडगांव, बोल्हेगांव या उपनगरांमध्ये आरोग्य केंद्रे सुरु केली
 • शहरातील विविध भागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक भवन

Post a Comment

Previous Post Next Post