भाजपला दारातही उभे करु नका : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही. त्यामुळे त्यांना दारात उभे करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली, तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यांना मते देऊ नका असे, आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील सभेत शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले आहे. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही. आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post