प्रदेश भाजपाचे कौतुक करावं तेवढ थोडंच : नरेंद्र मोदी


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्र आणि हरयाणातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा जनतेचा आशिर्वाद प्राप्त केला आहे, त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये चांगली कामे केली आणि त्या जोरावर आज पुन्हा सत्तेत येण्याची किमया साधली, त्यामुळे प्रदेश भाजपाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना प्रोत्साहीत केले. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात भाजपा कर्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते.
मोदी म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि हरयाणात मनोहरलाल खट्टर यांचा पहिलाच अनुभव होता. हे दोघे यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारमध्ये मंत्रीही नव्हते. मात्र, तरीही दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टीमने पाच वर्षे महाराष्ट्र आणि हरयाणाची सेवा केली. प्रामाणिकपणे राज्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले. त्याचा परिणाम म्हणून हे यश मिळाल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post